लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू
लातूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरु लातूर, दि. १५ जुलै : लातूर येथील लाहोटी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेसमोर विविध मागण्यांसाठी श्री. ज्ञानोबा शिवाजी दुनगावे आणि श्री. गोविंद शिवाजी दुनगावे यांनी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. उपोषणस्थळी लावलेल्या फलकानुसार, मुलांच्या वसतिगृहातील भोजनालयासाठी काढण्यात आलेली नवीन निविदा तात्काळ रद्द करून यापूर्वीचे भोजनालय पूर्ववत सुरू करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच संस्थेचे प्राचार्य एस. बी. कुलकर्णी यांच्यावर जातीयवादी वर्तनाचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, यासाठी आमरण उपोषण करण्यात येत असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि संस्थेतील प्रशासनाने...