नसरापूरच्या चिमुरडीला न्याय! नराधम भीमराव कांबळेला अवघ्या ६० दिवसांत मरेपर्यंत फाशी
"नसरापूरच्या चिमुरडीला न्याय! नराधम भीमराव कांबळेला अवघ्या ६० दिवसांत मरेपर्यंत फाशी"
पुणे, दि. २९ :- नसरापूर येथील अल्पवयीन चिमुरडीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात न्यायालयाने अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आरोपी भीमराव कांबळे याला अवघ्या ६० दिवसांच्या आत खटल्याचा निकाल देत मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, समाजातूनही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर धाक बसावा, असा संदेश या निकालातून गेला आहे.