चोरट्यांचा धुमाकूळ! मनपा शाळा आणि उद्यानाचे लोखंडी गेटच लंपास!

चोरट्यांचा धुमाकूळ! मनपा शाळा आणि उद्यानाचे लोखंडी गेटच लंपास!

    लातूर, दि. 28:- "लातूर शहरातील सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लेबर कॉलनीजवळील मनपा शाळा क्रमांक 26 येथे कंपाऊंड वॉलला बसवलेले अँगल तसेच दोन्ही लोखंडी गेट अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत. एवढेच नव्हे, तर बादाडे नगर येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले उद्यानातील कंपाऊंड वॉलवरील लोखंडी अँगलही चोरीला गेले आहेत.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या शाळा आणि उद्यानांची अशी दुर्दशा होत असताना संबंधित प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. शहरातील अनेक शाळा आणि उद्यानांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नसल्याचे सांगितले जात आहे.
या चोरीची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी महानगरपालिकेने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे."

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर