मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन
मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : मुंबई येथील शिवसेना भवनात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी उपस्थिती दर्शविली. या वेळी एकूणच कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित राहून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथराव शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी पुरस्कारप्राप्त सर्व व्यक्तींना महिन्याला वीस हजार रुपयांचे मानधन देण्यास मान्यता दिली असल्याचे जाहीर केले. तसेच, या सर्वच पुरस्कारप्राप्त व्यक्तींना एसटी बसमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्यात समाज नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अॅड. वैजनाथ वाघमारे यांनीही आपले मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य केल्या असून त्या तातडीने अंमलात आणल्या जातील.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींना हा सोहळा गौरवाचा क्षण ठरला. कार्यक्रमात समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच, पुढील कार्यकारिणी बैठक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली असून, या बैठकीस सर्व जिल्ह्यांतील पुरस्कारप्राप्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम समाजातील एकात्मता, गौरव आणि प्रगतीचे प्रतीक ठरला असून, उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमानाचे वातावरण दिसून आले.
९/१०/२०२५ रोजी मा.वैजनाथजी वाघमारे यांनी बाळासाहेब ठाकरे सभागृह मंत्रालय येथे बैठक घेतली.
सन्माननीय वाघमारेजी यांनी पुरस्कार्थीचे मानधन मिळवणे, सर्व प्रकारच्या एस.टी.ने प्रवास हे प्रश्न शासकिय पातळीवर आदरणिय ना.एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महोदय यांचे कडुन सोडविण्याचे सर्वस्वी प्रयत्न करुन ते मिळवुन दिले जाईल हा दिलासा दिला.
भविष्यात पुरस्कारर्थीच्या समस्यां सोडविण्यासाठी मजबुत संघटन उभे करायचे आहे. तरी सर्वानी सहमती देऊन मेळाव्यास योगदान द्यावे.
निमंत्रक सर्वच पुररस्कार्थी संपर्क व सविस्तर माहिती शसाठी तसचे विभागिय व स्थानिक पातळीवर माहिती तयार करणेसाठी कार्यकर्त्यानी प्रयत्न करावे. अहिल्या नगर सन्माननीय. नामदेवराव चांदणे, (अहिल्यानगर) ९२७००४३६९६,
राजेंद्रजी मोहिते(इचलकरंजी) ९१५६६८८५६६,
सुनंदा ताई चांदणे (अकोला) ७०५७९४५८५२,
उषाताई नेटके (पुणे) ९९२१९४६४१४,
पोपटराव वाघ (सटाणा)८०५५६५८७२६,
चंद्रकांतजी वानखडे(नागपुर) ९८६०४६८६१८,
शंकरराव उमापे(सातारा) ९८८११६०२७८,
सर्वच पुरस्कारर्थीनी एक दुसऱ्याशी संपर्क साधुन एकसंघ व्हावे
संपर्क सविस्तर माहिती साठी
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता ९८५०७६६२३३ यावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्यातील पुरस्कारप्राप्त व्यक्तींना केले आहे.