प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर उदगीर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई.११ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल


प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर उदगीर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई.११ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

      लातूर, दि.07:- महाराष्ट्र शासनाने जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, विक्री व वाहतुकीवर बंदी घातलेली असताना काही व्यक्तींकडून या आदेशांचे उल्लंघन चोरट्या मार्गाने लपून-छपून प्रतिबंधित पदार्थांची अवैध वाहतूक व विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर भूमिका घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनात उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत तब्बल ११ लाख ६८ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ व वाहन जप्त केले आहे.
                   पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गु.र.नं. ३५९/२०२६ अन्वये कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ५९(१)(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                   दि. ०६ जून २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास उदगीरहून लातूरकडे जाणाऱ्या मार्गावर बावळगाव पाटीजवळ पोलीस पथक गस्त व तपासणी करीत असताना एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.
                 तपासणीदरम्यान वाहनातून विमल पान मसाला या ब्रँडचे एकूण ३,१२० पुडे जप्त करण्यात आले. त्यांची किंमत सुमारे ३ लाख २७ हजार ६०० रुपये इतकी आहे. तसेच व्ही-१ सुगंधित तंबाखू या प्रकारचे ३,१२० पुडे आढळून आले असून त्यांची किंमत १ लाख ४० हजार ४०० रुपये इतकी आहे. याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा कंपनीची कार (एमएच-१२-पीक्यू-१२०९) किंमत अंदाजे ७ लाख रुपये जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ११ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
                या प्रकरणी 
१)सलीम बाबुमिया शेख (वय ४३ वर्षे, रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, ता. लातूर) 
२)अल्ताफ शफीक सय्यद (वय २९ वर्षे, रा. साळेगाव, ता. केज, जि. बीड)
                     यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे प्रतिबंधित पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत.
            सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांचे नेतृत्वातील पथका मधील पोलीस अंमलदार नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राजकुमार डबेटवार, संदिप केंद्रे, अभिजीत लोखंडे यांनी केली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर