नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा प्रहार!


मे महिन्यात तब्बल 1,739 गुन्हे दाखल; 25 कोटींचा मुद्देमाल जप्त!

     नांदेड, दि. 01 जून:- नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवत मे महिन्यात धडक कारवाई केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा, मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत एकूण 1 हजार 739 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, १ जूनपासून संपूर्ण महिनाभर गुटखा आणि अमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अवैध व्यवसायांची माहिती नागरिकांनी थेट पोलिसांना द्यावी यासाठी ‘खबर’ हेल्पलाईन 91 50 100 100 सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी फोन किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन डीआयजी शहाजी उमाप यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर