“NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची लातूरमध्ये धडक!” “परीक्षेपूर्वीच पेपर बाहेर? निवृत्त प्राध्यापक ताब्यात”

“NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची लातूरमध्ये धडक!” “परीक्षेपूर्वीच पेपर बाहेर? निवृत्त प्राध्यापक ताब्यात”

लातूर, दि.16 :- “देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता लातूरचे नाव समोर आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI ने लातूरमध्ये धडक कारवाई करत सेवानिवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेपूर्वी तब्बल ७२ तास आधी प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. आतापर्यंत तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. आता नीट परीक्षा 28 जून 2026 रोजी होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. लातूर मधील एका नामांकित क्लासेसची आठ तास चौकशी सीबीआयने केली आहे.
CBI कडून विविध ठिकाणी चौकशी सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे. NEET सारख्या महत्त्वाच्या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.”

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर