पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून नांदेडमधील कुंटूर येथील हुस्सा वाळू घाटावर छापा


पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाकडून नांदेडमधील कुंटूर येथील हुस्सा वाळू घाटावर छापा

      लातूर, दि.19:- अवैध व्यवसाय विरोधी मोहीमेदरम्यान आणखी (64) गुन्हे दाखल, (75) इसमांविरुद्ध कारवाई, 3 कोटींचा  मुद्देमाल हस्तगत 

दिनांक 1 ते 31 मे, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे.

सदर मोहिमेच्या 18 व्या दिवशी, पोलीस उप महानिरीक्षक यांच्या अधिपत्याखालील पथकाने, नांदेड जिल्ह्यातील कुंटूर पोलीस ठाणे हद्दीत मौजे हुस्सा येथील वाळू घाटावर धाड टाकून, (5) हायवा, एक टिप्पर, जेसीबी मशीन, इंजिन बोट व 50 ब्रास वाळू असा 2,36,50,000/-  रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमूद प्रकरणी पोलीस  (10) आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काल दिवसभरात, नांदेड परिक्षेत्रात मटका-जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्या एकूण (21) इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत (15) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून 2,51,100/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, अवैध दारू विक्री करणाऱ्या (37) इसमांविरुद्ध (37) गुन्हे दाखल करून, त्यांच्याकडून 2,27,880/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्धही अन्य (2) गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून 25,32,500/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उपरोक्त कारवाई सोबतच, शस्त्र अधिनियमान्वये (1), कोटपा अन्वये (2), तर इतर अधिनियमाखाली मिळून, एकूण (64) कारवाया करण्यात आल्या असून, यात निष्पन्न झालेल्या आरोपीतांकडून एकूण 3,10,21,350/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 *' खबर ' हेल्पलाईन वरून तक्रारी :* अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइनला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती, सदर क्रमांकावर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे पाठवावी, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर