गावठी पिस्तूल विक्रीसाठी निघालेल्या आरोपीस अटक; अवैध शस्त्र जप्त. एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई



गावठी पिस्तूल विक्रीसाठी निघालेल्या आरोपीस अटक; अवैध शस्त्र जप्त. एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई


     लातूर, दि. 28:- आगामी सणाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून विशेष दक्षता घेतली जात असून, जिल्ह्यातील सर्व संवेदनशील भागात कॉम्बिंग ऑपरेशन, नाकाबंदी, वाहन तपासणी तसेच संशयित व्यक्तींवर विशेष नजर ठेवण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण व धाडसी कारवाई करत गावठी पिस्तूल विक्रीसाठी फिरत असलेल्या आरोपीस पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे.
              याबाबत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत माधवराव मोरे, पोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामे

१) गोविंद रंगनाथ डुरे, वय २८ वर्षे, रा. टाकळी ता. जि. लातूर
                 यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.न. २९१/२०२६ कलम ३/२५, ५/२५ भारतीय हत्यार अधिनियम सह कलम ३(५) बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               दि. २७/०५/२०२६ रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे डी.बी. पथक व पोलीस अधिकारी हे बकरी ईद सणाच्या अनुषंगाने परिसरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवत होते. दरम्यान पोउपनि श्रीकांत मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, दोन इसम हे स्कुटी क्रमांक एमएच-२४-सीई-४६४३ या वाहनावरून नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडमार्गे गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी येत आहेत.
            पोलिसांनी  तात्काळ सापळा रचला व एका हॉटेल परिसरात संशयित वाहन दिसून येताच पोलिसांनी शिताफीने वाहन अडवला.पोलिसांची चाहूल लागताच संशयितांची तारांबळ उडाली; मात्र पोलिसांनी तत्पर हालचाल करत आरोपी गोविंद रंगनाथ डुरे यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक गावठी पिस्तूल मिळून आले. सदर पिस्तूल बाळगण्याबाबत कोणताही वैध परवाना अथवा कागदपत्रे आरोपीकडे आढळून आली नाहीत.
             त्यानंतर पोलिसांनी गावठी पिस्तूल जप्त करून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, सदर शस्त्र कोठून आणण्यात आले, कोणाला विक्री करण्यात येणार होते, तसेच या प्रकरणामागे आणखी कोणते रॅकेट कार्यरत आहे का याचा तपास सुरू असताना नमूद प्रकरणात अटक आरोपी चे आणखीन साथीदार 

२) सिद्धू माने, रा. आर्वी ता. जि. लातूर,(फरार)

३) विकास हिंगे, रा. हरगुंळ बु. ता. जि. लातूर(फरार)

यांचा नमूद प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचाही शोध घेण्यात येत असून लवकरच त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे.
               विशेष म्हणजे आगामी सण-उत्सवांच्या काळात जिल्ह्यात शांतता व सलोखा अबाधित राहावा यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल अत्यंत दक्षतेने काम करत आहे. अवैध शस्त्रास्त्रे, समाजकंटक, गुन्हेगारी प्रवृत्ती तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटकांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल कटिबद्ध आहे.
               सदर कारवाई श्री अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लातूर, श्री मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लातूर तसेच श्री समीरसिंह साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
              या कारवाईमध्ये पोउपनि श्रीकांत मोरे, डी.बी. पथकाचे पोलीस अमलदार बळवंत भोसले,राजाभाऊ म्हस्के सचिन गिरी यांनी सक्रिय सहभाग घेतला.
          सदर गुन्ह्याचा पुढील तपास  वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सानप हे करीत आहेत.
                 लातूर जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, परिसरात संशयास्पद हालचाली, अवैध शस्त्रास्त्रांची माहिती अथवा समाजविघातक प्रवृत्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर