“नांदेडमध्ये अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा धडाका!”
“नांदेडमध्ये अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा धडाका!”
नांदेड, दि.21:- “नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम सुरू केली असून, केवळ 20 दिवसांत तब्बल 56 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत सुमारे 73 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मटका-जुगार, अवैध दारू विक्री, अवैध वाळू उपसा तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
विशेष म्हणजे, नांदेड शहरातील वजीराबाद पोलिसांनी ब्राऊन शुगरसह आरोपींना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. नागरिकांनीही ‘खबर’ हेल्पलाईनवर माहिती देत पोलिसांना सहकार्य करण्यास सुरुवात केली आहे.
अवैध व्यवसायांविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.”