“नांदेडमध्ये अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा धडाका!”
“नांदेडमध्ये अवैध व्यवसायांवर पोलिसांचा मोठा धडाका!”
नांदेड, दि. 18:- “नांदेड परिसरात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली असून, लिंबगाव येथील गोदावरी नदी घाटावर धाडसी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर छापा टाकत दोन हायवा, टिपर, जेसीबी, बोट आणि मोठ्या प्रमाणात वाळू असा तब्बल 1 कोटी 36 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
यासोबतच गुटखा विक्री, मटका-जुगार आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. संपूर्ण मोहिमेत 45 गुन्हे दाखल करण्यात आले असून 71 इसमांविरुद्ध कारवाई झाली आहे. एकूण 2 कोटी 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘खबर’ हेल्पलाईनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.”