लक्ष्मी अर्बन बँकेस बेस्ट डिजिटल बँक पुरस्कार प्रदान

लक्ष्मी अर्बन बँकेस बेस्ट डिजिटल बँक पुरस्कार प्रदान

  लातूर, दि.15 : सहकार व बँकिंग या वित्तिय क्षेत्रात उत्तमपणे दर्जेदार सेवा देणाऱ्या सहकारी बँकेस देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील मानाचा बेस्ट डिजिटल बँक हा पुरस्कार लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर या बँकेस मिळाला आहे.

नागरी सहकारी बँक टियर २ गटातील प्रथम पुरस्कार लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर बँकेस  महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशन लि, मुंबई व क्रेष्ट इन्फोमिडिया यांच्यातर्फे आयोजित १० व्या अखिल भारतीय अर्बन को-ऑप. बँक संमेलनामध्ये क्रेष्ट इन्फोमिडिया चे सीईओ मा. श्री. गौतम नवीन व सिंगटेक अँड ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ व कार्यकारी संचालक मा.श्री. सुजित सिंग यांच्या हस्ते दिनांक ०९ मे २०२६ रोजी हॉटेल दि वेस्टीन कोरेगाव पार्क, पुणे येथे प्रदान करण्यात आला. 

यावेळी पुरस्कार स्विकारण्यासाठी बँकेचे व्हा. चेअरमन श्री सतीशजी भोसले, तज्ञ संचालक सीए श्री राजेशजी अग्रवाल, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविनाशजी आळंदकर, आयटी अधिकारी श्री सुहास राजमाने उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट बँकांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने हा पुरस्कार दिला जातो. सदरील पुरस्कार बँकेस मिळणे हे अभिमानास्पद आहे. सदर पुरस्कारासाठी तज्ञ समितीने बँकेच्या कार्याचे मूल्यांकन करून निवड केली आहे.

लक्ष्मी अर्बन बँकेच्या संचालक मंडळ व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने बँकेचे अधुनिक डिजीटल बँकिंग मध्ये रुपांतर केले आहे. लक्ष्मी अर्बन बँक हि सहकारी बँकामधील लातूर जिल्ह्यातील संपूर्ण डिजीटल सेवा सुरू करणारी पहिली बँक आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शन सूचना व सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून लक्ष्मी अर्बन बँकेने अतिशय प्रेरणादायी वाटचाल केली आहे. आज बँकेकडे UPI, IMPS, Mobile Banking App, ATM Card, QR Code, NACH, BBPS,DBT, Franking अशा अधुनिक सुविधा कार्यान्वित आहेत. या सुविधांचा लाभ बँकेच्या हजारो ग्राहकांना होत आहे. 

या यशस्वी वाटचालीत सभासद, ग्राहकांची मोलाची साथ व बँकेच्या कर्मचारी वर्गाने संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली केलेले काम तसेच बँकेचे स्थानिक सल्लागार, पिग्मी प्रतिनिधी व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेस राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे मत, बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. 

श्री अशोक अग्रवाल यांनी संचालक मंडळ, सभासद, ग्राहक, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी व हितचिंतक  यांचे अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर