स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.उदगीर येथे ७ लाख ९३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त.एका आरोपीस वाहनासह घेतले ताब्यात

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.उदगीर येथे ७ लाख ९३ हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त.एका आरोपीस वाहनासह घेतले ताब्यात
 
        लातूर, दि.14  लातूर जिल्ह्यात अवैध गुटखा व तंबाखू विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणातील गुटखा, सुगंधित तंबाखू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण ₹७,९३,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे.
                 पोलीस अधीक्षक, लातूर  श्री अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात अवैध धंदे, मादक पदार्थ, गुटखा व तंबाखू विक्रीविरोधात कठोर मोहीम सुरू असून अपर पोलीस अधीक्षक, लातूर श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सदानंद भुजबळ यांनी त्यांच्या पथकास गुप्त माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार दिनांक 13 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्यासाठी लातूर जिल्ह्यात रवाना झाले होते.
                 दरम्यान दिनांक 13 मे रोजी उदगीर तालुक्यातील डिग्रस पाटी परिसरात सकाळी सुमारे 10.40 वाजण्याच्या सुमारास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी स्वीफ्ट डिझायर कारमधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार आहे. माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन डिग्रस गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सापळा रचला.
काही वेळात संशयित वाहन क्रमांक MH-12 KN-3966 हे येताना दिसताच पोलिसांनी वाहनास थांबवून चालकाची चौकशी केली. त्याने आपले नाव 

1)ओमकार नरसन नरहारे (वय 21 वर्षे), रा. हैबतपूर ता. उदगीर, सध्या रा. आष्टामोड ता. चाकूर जि. लातूर असे सांगितले.
                  यानंतर वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली असता वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू आढळून आली. सदर वाहनामध्ये विमल पान मसाला गुटखा, व्ही-1 सुगंधित तंबाखू , वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्वीफ्ट डिझायर कार क्रमांक MH-12 KN-3966 — किंमत ₹४,५०,०००/- असा एकूण ₹७,९३,२००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
                आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित गुटखा व तंबाखूची वाहतूक व विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.याप्रकरणी आरोपी ओमकार नरसन नरहारे याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे कलम 123, 223, 274, 275 भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
                      सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, लातूर श्री. अमोल तांबे यांच्या निर्देशनाखाली,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली खालील पथकामधील मनोज  खोसे, अर्जुन राजपूत,रियाज सौदागर, साहेबराव हाके, आनंद हल्लाळे यांनी केली अस लातूर जिल्हा पोलीस दलामार्फत अवैध गुटखा व तंबाखू विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर व प्रभावी कारवाई सुरू राहणार आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर