अतिक्रमण मुक्त लातूरकडे.. एक पाऊल आजच टाका.
“गंजगोलाईत कारवाई... पण शहरातील रस्ते अजूनही अतिक्रमणाच्या विळख्यात!”
लातूर, दि.07:- शहरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने गंजगोलाई परिसरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली खरी, मात्र शहरातील मुख्य रस्ते आजही अतिक्रमणाने व्यापलेले असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
वाहतुकीची कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि पादचाऱ्यांची होणारी गैरसोय यामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आयुक्त मानसी मीना यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मोठे आणि ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा होती. त्यानंतर महिला महापौर आल्यानंतरही शहरात बदल दिसेल, अशी नागरिकांची आशा होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही.
लातूरकरांची आता एकच मागणी आहे —
“निवडक कारवाई नको… संपूर्ण शहर अतिक्रमणमुक्त करा… रस्ते मोकळे करा आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करा!”
हीच भावना आज सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.