उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या खून प्रकरणात तीन आरोपींना जन्मठेप.मा.अतिरिक्त सत्र न्यायालय, उदगीर यांचा महत्त्वपूर्ण निकाल


उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या खून प्रकरणात तीन आरोपींना जन्मठेप.मा.अतिरिक्त सत्र न्यायालय, उदगीर यांचा महत्त्वपूर्ण निकाल

   लातूर, दि.09:- उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर खून प्रकरणात मा. अतिरिक्त सत्र न्यायालय उदगीर यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मा. न्यायाधीश श्री. डी. बी. म्हालटकर यांनी सत्र खटला क्र. 25/2021 मध्ये हा निकाल दिला.
            सदर प्रकरणात उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुरनं. 63/2021 अन्वये भादंवि कलम 302, 307, 341, 143, 147, 148, 149 तसेच आर्म अक्ट कलम 4 व 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील फिर्यादी जनाबाई बाळासाहेब बिरादार, रा. दैठणा ह.मु. हेर ता. उदगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली होती. पोलिसांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व सूचनेनुसार अतिशय बारकाईने गुन्ह्याच्या तपास करून साक्षीदारांचे जबाब,आरोपीविरुद्ध भरपूर परिस्थितीजन्य व भौतिक पुरावे गोळा करून आरोपी नामे 
1) बालाजी माधव जगताप वय 60 वर्षे,
2)लहु बालाजी जगताप वय 25 वर्षे,
3)अंकुश बालाजी जगताप वय 22 वर्षे, सर्व रा. हेर ता. उदगीर. यांच्याविरुद्ध मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
            खटल्याच्या सुनावणीअंती मा. न्यायालयाने आरोपी क्र. 1, 2 व 3 यांना भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व प्रत्येकी 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच कलम 307 सह 34 अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 1000 रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय कलम 323 सह 34 व कलम 341 सह 34 अन्वये देखील शिक्षा सुनावण्यात आली.
                   या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक दिपकुमार वाघमारे यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनात अत्यंत बारकाईने व शास्त्रोक्त पद्धतीने केला. न्यायालयीन कामकाजात पैरवी अंमलदार पोलीस अमलदार ए. एस. शेख यांनी प्रभावी समन्वय साधला. 
             सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. एस. एम. गिरवलकर यांनी सक्षम युक्तिवाद करून आरोपींविरुद्धचे ठोस पुरावे प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडले. त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपींना कठोर शिक्षा होण्यास मदत झाली.
                 गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये काटेकोर तपास, सक्षम पुरावे व प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा यामुळे दोषींना शिक्षा मिळवून देण्यात लातूर जिल्हा पोलीस दल सातत्याने यशस्वी ठरत असल्याचे या निकालातून अधोरेखित झाले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर