बीड जिल्ह्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात तत्कालीन जिल्हाधिकारी, बीड अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक


बीड जिल्ह्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात तत्कालीन जिल्हाधिकारी, बीड अविनाश पाठक यांना लातूर येथून अटक

      लातूर, दि.07:-  बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आज बीड पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून पोलीस स्टेशन शिवाजीनगर, बीड येथील गुन्हा क्रमांक 544/2026 मधील निष्पन्न आरोपी नामे अविनाश प्रभाकर पाठक (वय 55 वर्षे), तत्कालीन जिल्हाधिकारी बीड, रा. हत्ते नगर, लातूर यांना आज लातूर येथून कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई मा. वेंकटरामन (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज तथा अतिरिक्त पदभार उपविभाग बीड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.
             सदर गुन्हा भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 316(5), 338, 336(3), 340(2), 198, 199, 316(2), 351(4) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, 13 आणि मध्यस्थी व सलोखा कायद्यातील कलम 14, 34 अन्वये दाखल आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आज सकाळी बीड येथून विशेष पोलीस तपास पथक लातूर येथे दाखल झाले. या तपास पथकाने लातूर जिल्हा पोलिसांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी अविनाश पाठक यांना गुन्ह्याचे तपास कामी  ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आले आहे. बीड जिल्हा पोलीस तपास पथक पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर