स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चोरीचे गुन्हे उघड – दोन आरोपी जेरबंद, सोन्याची अंगठी जप्त.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चोरीचे गुन्हे उघड – दोन आरोपी जेरबंद, सोन्याची अंगठी जप्त.

       लातूर, दि.06:-  लातूर जिल्हा पोलीस दलाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये राबविण्यात येत असलेली गुन्हेगारीविरोधातील मोहिमे अंतर्गत कारवाई करत चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परता आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर दोन सराईत आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
                 दि. 05 मे 2026 रोजी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखा, लातूर च्या पथकाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे  मार्गदर्शनात व सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करून संशयित आरोपींचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान,आज मध्यरात्री  पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, मालमत्तेविषयक गुन्ह्यातील आरोपी चोरीचा माल विक्रीसाठी पिंपळफाटा येथे येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून दिनांक 06 मे 2026 रोजी 02.10 वाजताचे सुमारास दोन संशयित इसम घटनास्थळी आढळून आले. त्यांची कसून चौकशी व झडती घेतली असता त्यापैकी एक इसम हा रेकॉर्डवरील आरोपी
१)  वसीम रज्जाक शेख (वय 23, रा. सिंधगाव, ता. रेणापूर) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यासोबत असलेला 
२) इम्रान महेताब शेख (वय 26, रा. सिंधगाव, ता. रेणापूर) 
                  यालाही ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान वसीम शेख याच्या ताब्यातून अंदाजे 5 ग्रॅम वजनाची सुमारे 50,000/- रुपये किंमतीची सोन्याची अंगठी जप्त करण्यात आली. सदर अंगठी ही औसा येथील बसस्थानकाजवळील एका वयोवृद्ध व्यक्तीकडून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
                 तपासादरम्यान या आरोपींचा लातूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी दाखल असलेल्या इतर गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे उघड झाले असून, पोलीस स्टेशन औसा (गु.र.नं. 200/2026), विवेकानंद चौक लातूर (गु.र.नं. 307/2025) तसेच रेणापूर पोलीस ठाण्यात दाखल 90/2026 मधील  पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.तसेच, आरोपी वसीम शेख याने विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चोरीचा माल सराफ लाईन, लातूर येथील सुवर्णकाराकडे विक्री केल्याची माहितीही दिली असून त्याबाबत  पुढील तपास सुरू आहे.
            ताब्यात घेतलेल्या आरोपींना     औसा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
               सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वात पोउपनि. राजेश घाडगे, सपोउपनि. सर्जेराव जगताप पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, प्रदीप स्वामी, मोहन सुरवसे, प्रदीप चोपणे, रामदास बाचीफळे,हरी पतंगे यांनी केली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर