नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; आठवड्यात 335 गुन्हे दाखल!


“नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; आठवड्यात 335 गुन्हे दाखल!

नांदेड, दि.८:- नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे.
गुटखा, मटका-जुगार, अवैध दारू विक्री आणि शस्त्र अधिनियमांतर्गत केवळ एका आठवड्यात तब्बल 335 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 कोटी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 7 मे 2026 दरम्यान ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत एकूण 470 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये —
▪️ गुटखा विरोधात 7 कारवाया
▪️ मटका-जुगार प्रकरणी 82 गुन्हे
▪️ अवैध दारू विक्रीवर 196 कारवाया
▪️ शस्त्र अधिनियमांतर्गत 19 गुन्हे
▪️ तर इतर विविध प्रकरणांत 31 कारवाया करण्यात आल्या.
पोलिसांनी नागरिकांना ‘खबर’ हेल्पलाईनवर माहिती देण्याचे आवाहन केले असून, अवैध धंद्यांविरोधातील मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
“अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचा धडाका कायम!”

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर