“एका वर्षानंतर बेपत्ता मुलाचा शोध; लातूर पोलिसांना मोठे यश!” “तिरुपतीत सापडला 14 वर्षीय अथर्व; शिवाजीनगर पोलिसांची तांत्रिक तपासात कमाल!”

“एका वर्षानंतर बेपत्ता मुलाचा शोध; लातूर पोलिसांना मोठे यश!” “तिरुपतीत सापडला 14 वर्षीय अथर्व; शिवाजीनगर पोलिसांची तांत्रिक तपासात कमाल!”

    लातूर, दि. 21 : लातूर शहरातील सिग्नल कॅम्प परिसरातून जून 2025 मध्ये बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय अथर्व गपाट या अल्पवयीन मुलाचा तब्बल एका वर्षानंतर आंध्रप्रदेशातील तिरुपती येथून सुखरूप शोध घेण्यात शिवाजीनगर पोलिसांना मोठे यश आले आहे.
शाळेसाठी घराबाहेर पडलेला अथर्व अचानक बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोशल मीडिया अकाउंट्स, डिजिटल पुरावे आणि सायबर तपासाच्या मदतीने अथर्वचा माग काढला. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील हालचालींचे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
दि. 19 मे 2026 रोजी अथर्व तिरुपती येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पथक पाठवून त्याला ताब्यात घेतले आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.
लातूर पोलिसांच्या चिकाटी, संयम आणि तांत्रिक तपासामुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर