लातूर पोलिसांची कारवाई: तब्बल 1 कोटी 18 लाख 27 हजार रुपयांचा 714 किलो गांजा जाळून केला नाश

लातूर पोलिसांची  कारवाई: तब्बल 1 कोटी 18 लाख 27 हजार रुपयांचा 714 किलो गांजा जाळून केला नाश

       लातूर, दि.8:   पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या उपस्थितीत NDPS अंतर्गत जप्त अंमली पदार्थांचा कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने नाश करण्यात आला.जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांकडून  आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून विविध 45 गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला तब्बल 1 कोटी 18 लाख 27 हजार रुपयांचा अंमली पदार्थ साठा आज कायदेशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने जाळून पूर्णपणे नाश केला. या कारवाईत सुमारे 713.92 किलो गांजा, 21.200 किलो अफू आणि 96 ग्रॅम एमडी ड्रग्ज यांचा समावेश होता.
       पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. 
                लातूर जिल्हा पोलीस दलाने मागील काही महिन्यांत अंमली पदार्थांची लागवड, वाहतूक, विक्री आणि सेवन याविरोधात सातत्याने विशेष मोहिमा राबवत मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या होत्या. त्या कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा, अफू व इतर अंमली पदार्थ न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून  नाश करण्यासाठी आवश्यक आदेश प्राप्त करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी NDPS अक्ट कलम 52 (अ) अन्वये अधिकृत पंचनामा प्रक्रिया राबवून संपूर्ण मुद्देमाल   किर्ती ऑईल मिल, अतिरिक्त एमआयडीसी, लातूर येथे कायदेशीर प्रक्रिया करून पंच, समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व मुद्देमाल फायर बॉयलरमध्ये टाकून पूर्णतः जाळून नाश करण्यात आला. कारवाईदरम्यान कोणतेही प्रदूषण होऊ नये तसेच परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली होती. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, रासायनिक विश्लेषकांचे पथक, वैध मापन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती ठेवण्यात आली होती. 
               या कारवाईवेळी प्रभारी पोलीस उपाधीक्षक (गृह) दत्तात्रय निकम, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस मुख्यालयाचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर