“रक्तदानासोबत हेल्मेट वाटप – ‘One Helmet One Life’ संदेश”


“रक्तदानासोबत हेल्मेट वाटप – ‘One Helmet One Life’ संदेश”

लातूर, दि.28 :- लातूर जिल्हा पोलिस, इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित डॉ. भालचंद्र ब्लड सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त १ मे २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी ८ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध ठिकाणी – पोलिस अधीक्षक कार्यालय, एमआयडीसी पोलिस स्टेशन, गांधी चौक, विवेकानंद चौक आणि लातूर ग्रामीण पोलिस स्टेशन येथे पार पडणार आहे.
या उपक्रमामध्ये रक्तदात्यांना हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात येणार असून “One Helmet One Life” या संदेशातून सुरक्षिततेचाही महत्त्वपूर्ण संदेश दिला जाणार आहे.
तरी लातूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान – चला, जीवन वाचवण्यासाठी पुढे येऊया!

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर