“लातूरमध्ये IPL सट्ट्यावर पुन्हा कारवाई! ४ आरोपी अटकेत, १३.७ लाखांचा मुद्देमाल जप्त.
“लातूरमध्ये IPL सट्ट्यावर पुन्हा कारवाई! ४ आरोपी अटकेत, १३.७ लाखांचा मुद्देमाल जप्त.
“IPL सट्टा रॅकेटचा पर्दाफाश!”
“४ आरोपी रंगेहात अटकेत!”
“लाखोंचा मुद्देमाल जप्त!”
लातूरमध्ये आयपीएल सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई करत सट्टा रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
👉
या कारवाईत चार आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल १३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशांवर आणि मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दि. १३ एप्रिल रोजी अंबेजोगाई रोड परिसरात एका चारचाकी वाहनात बसून आरोपी आयपीएल सामन्यांवर सट्टा घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून छापा टाकत आरोपींना ताब्यात घेतले.
छाप्यात मोबाईल फोन, लॅपटॉप, रोख रक्कम, सट्टा नोंदी आणि क्रेटा कार असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी हे “सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स” या सामन्यावर सट्टा घेत असल्याचे समोर आले आहे. सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. लातूर पोलिसांची ही कारवाई अवैध सट्टा व्यवसायावर मोठा आळा घालणारी ठरत आहे.
“अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओ लाईक करा!”