सहकार महर्षी व माजी मंत्री मा.श्री. दिलीपराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ७५ जणांनीे रक्तदान!
औसा, दि.19 :- श्री संत शिरोमणी कारखान्यावर एका अभिमानास्पद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहकार महर्षी व माजी मंत्री मा.श्री. दिलीपराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना येथे ७५ जणांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व बजावले.
या रक्तदान शिबिराला जिल्हा रक्तपेढी, यांचे सहकार्य लाभले. संत शिरोमणी कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, व्हा. चेअरमन सचिन पाटील, संचालक गणपतराव बाजुळगे, शामराव साळुंखे, भरत माळी, चंद्र सेन पाटील, बाबासाहेब गायकवाड, संतोष भोसले, अनिल पाटील, कार्यकारी संचालक सदाशिव बहीर,
, जि.प. सदस्या सहीताई गोरे, शालिनीताई चव्हाण, पंचायत समिती सदस्य अंजुनबी कारभारी, नारायण लोखंडे, उदयसिंह देशमुख, नामदेव माने, माऊली ब्लड बँकेचे डॉक्टर कुलदीप पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात यावेळी कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, कारखान्याचे भरभराटीचे योगदान देणारे कामगार, सभासद, गणपतराव साळुंके, शामराव साळुंके, भरत माळी, चंद्रसेन पाटील, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले.
रक्तदान हे सर्वोच्च दान आहे, असे म्हणत या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे."
"अशा सामाजिक उपक्रमांसाठी संत शिरोमणी कारखान्याला मन:पूर्वक अभिनंदन!
तुम्हीही रक्तदान करा, जीवन वाचवा.