पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मोठा वाद शांततेत मिटला!”
“पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर; मोठा वाद शांततेत मिटला!”
“पाईपलाईन वादावर औराद पोलिसांची झटपट कारवाई!”
“तणावपूर्ण परिस्थिती टळली; दोन्ही शेतकऱ्यांचा समाधानाचा निर्णय!”
“अमोल तांबे यांच्या उपक्रमाचा प्रभाव; गावात शांतता!”
“औराद पोलिसांची समंजस भूमिका; वाद मिटला एका फोनवर!
लातूर, दि.१०:- लातूर जिल्ह्यात ‘पोलीस शेतकऱ्यांच्या बांधावर’ या उपक्रमांतर्गत औराद पोलिसांनी एक महत्त्वाची आणि संवेदनशील कारवाई करत दोन शेतकऱ्यांमधील पाईपलाईनचा वाद शांततेत मिटवला आहे.
मौजे होसुर परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला हा वाद आज पुन्हा पेटला आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र, माहिती मिळताच औराद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हनुमंत बांगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दोन्ही पक्षांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, कायदेशीर बाबी समजावून सांगत त्यांनी समंजसपणे मध्यस्थी केली आणि अखेर हा वाद शांततेच्या मार्गाने सोडवण्यात यश मिळवले.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील वाद वेळेत मिटवले जात असून, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात मदत होत आहे.
या कारवाईमुळे मोठा तणाव टळला असून, दोन्ही शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत परस्पर सहमतीने प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आहे.”