ममदापूरमध्ये १७ एप्रिलला महसूल समाधान शिबीर!”“एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा – नागरिकांसाठी मोठी संधी!”
“ममदापूरमध्ये १७ एप्रिलला महसूल समाधान शिबीर!”
“एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा – नागरिकांसाठी मोठी संधी!”
“शेतकरी व नागरिकांसाठी लाभदायी उपक्रम!”
“तहसीलदारांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन”
नमस्कार. नंदादीप वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत. लातूर तालुक्यातील ममदापूर येथे १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमात नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिरात पंचायत समितीकडून घरकुल, गोठा आणि विहीर योजनांची माहिती दिली जाणार आहे, तर कृषी विभागाकडून ॲग्रीस्टॅक, फार्मर आयडी, बी-बियाणे आणि खतांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून ‘क’ पत्रक, नकाशे आणि जमीन मोजणीसंबंधी सेवा मिळणार आहेत. आरोग्य विभागाकडून तपासणी आणि आयुष्यमान कार्ड वाटपही करण्यात येणार आहे.
यासोबतच महिला व बाल विकास विभाग, वीज वितरण विभाग आणि तहसील कार्यालयाकडून विविध दाखले, योजना आणि सेवा नागरिकांना दिल्या जाणार आहेत.
तसेच संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड सेवा आणि जिवंत सातबारा यांसारख्या महत्त्वाच्या सुविधांचाही लाभ येथे मिळणार आहे.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.