नांदेड : १३ लाखांचा गुद्या जप्त! ३ जणांना अटक | मोठी पोलिस कारवाई

नांदेड : १३ लाखांचा गुद्या जप्त! ३ जणांना अटक | मोठी पोलिस कारवाई

नांदेड जिल्ह्यात मोठी पोलिस कारवाई उघडकीस आली आहे.
३१ मार्च रोजी सायंकाळी पोलिसांनी गुद्या आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीवर धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १३ लाख ४० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुद्या आणि इतर माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फय्युम शेख, निसार बिस्ती आणि मोहन सय्यद यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुद्या आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापारावर कठोर कारवाई सुरू असून, नागरिकांनीही अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ही कारवाई आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण अशा पदार्थांमुळे तरुण पिढीवर गंभीर परिणाम होत आहेत.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर