भारतीय संविधान धर्मविहीन आणि इहवादीवादी आहे :- साहित्यिक प्रशांत वंजारे यांचे प्रतिपादन

भारतीय संविधान धर्मविहीन आणि इहवादीवादी आहे. 
     साहित्यिक प्रशांत वंजारे यांचे प्रतिपादन
      लातूर, दि.28 -(प्रतिनिधी ):- र्मविहीनता हा तर भारतीय संविधानाचा गाभाच आहे . भारताचा इतिहास ,वर्तमान आणि भविष्य लक्षात घेऊन भारताचे संविधान साकारले असून ते पूर्णत: धर्मविहीन आणि ईहवादी आहे. संविधानात कोणत्याही धर्माला स्थान नाही . त्यामुळे धर्मराज्य ही संकल्पना संविधान विरोधी आहे .असे प्रतिपादन यवतमाळचे सुप्रसिद्ध साहित्यिक तथा परिवर्तनवादी चळवळीचे भाष्यकर प्रशांत वंजारे यांनी केले आहे.
     लातूर येथील ' जी -24 ' प्रणित " महात्मा  बसवन्ना - महात्मा फुले- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती" समितीच्या वतीने भालचंद्र ब्लड बँके च्या सभागृहात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत प्रशांत वंजारे बोलत होते.
     कार्यक्रमाच्या सुरुवातीस महात्मा बसवण्णा, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले . प्राध्यापक डॉक्टर अशोक ननवरे यांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरसिंग घोडके यांनी केले .जयंती समिती अध्यक्ष अफजल कुरेशी यांनी व्याख्यानमालेची भूमिका आणि उद्देश सांगितला. श्रीकांत मुद्दे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. सुधाकर सदाशिव यांनी आभार मानले. यावेळी 'जी -24 ' चे सदस्य प्रा. मारुती गायकवाड यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.'भारतीय संविधान धर्मनिपेक्षता आणि धर्मराज्य ' या विषयावर तब्बल एक तास अभ्यासपूर्ण मांडणी करताना प्रशांत वंजारे म्हणाले की ,भारतामध्ये लोकशाही आणि संविधानाला सुरुवातीपासूनच ज्यांनी विरोध केला त्यांनीच आज राजसत्तेला विळखा घातला असून त्यांना धर्मनिरपेक्षते ऐवजी  धर्मराज्य आणायचे आहे .जे लोक आज तुरुंगात असायला हवेत त्यांच्याच हातात कायदा आल्यामुळे भारतीय संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे हे संकट  थोपविण्यासाठी आंबेडकरी चळवळ गतिमान करणे .हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितलें.
    या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्वश्री प्रा.डॉ .हर्षवर्धन कोल्हापुरे, प्रा.डॉ.निशिकांत वारभुवन ,प्रा.सुभाष भिंगे ,प्रा.सुभाष बेंजलवार ,शिरीष दिवेकर ,संग्राम वाघमारे, बालाजी सोनकांबळे ,जगन्नाथ येमले ,प्राचार्य आर .डी .निटूरकर ,सुभाष मस्के, एडवोकेट दीपक साठे आदींनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर