लातूरमध्ये आदर्श गुरु गौरव पुरस्कार प्रा. नाजेमा बेगम अब्बास यांना जाहीर

लातूरमध्ये आदर्श गुरु गौरव पुरस्कार 
नाजेमा बेगम अब्बास यांना जाहीर 
२३ रोजी पुरस्कार वितरण 
    लातूर, दि.२१ : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा.) जिल्हा लातूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श गुरु गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षक व शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये रूकय्या बेगम गर्ल 
उर्दू हायस्कूल, लातूरच्या शिक्षीका 
नाजेमा बेगम अब्बास यांना जिल्हास्तरीय आदर्श गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी विविध स्तरांवरील शिक्षक, अधिकारी व शैक्षणिक क्षेत्राशी निगडित मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.
परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, या गौरव सोहळ्यात गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच अंगणवाडी सेविका आणि इतर शैक्षणिक घटकांमधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. शिक्षणाच्या उन्नतीसाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
हा कार्यक्रम दयानंद कॉलेज सभागृह, लातूर येथे दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कारार्थी व संबंधित मान्यवरांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुरस्कार वितरणापूर्वी आवश्यक नोंदणी व इतर प्रक्रियेसाठी सर्वांनी किमान एक तास आधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.
या सोहळ्याच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा आणि त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शिक्षकांच्या योगदानामुळेच समाजाची घडण घडते, या भूमिकेतून अशा प्रकारच्या उपक्रमांना विशेष महत्त्व असल्याचेही आयोजकांनी नमूद केले.
दरम्यान, या गौरव सोहळ्यामुळे शिक्षक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य कार्याध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुरमे यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर