“नांदेडमध्ये पोलिसांची दुहेरी कारवाई! बनावट जर्दा कारखाना उध्वस्त, जुगार अड्ड्यावर छापा!
“नांदेडमध्ये पोलिसांची दुहेरी कारवाई! बनावट जर्दा कारखाना उध्वस्त, जुगार अड्ड्यावर छापा!
“बनावट जर्दा रॅकेटचा पर्दाफाश!”
“देगलूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका!”
“7.37 लाखांचा मुद्देमाल जप्त”
“8 जण ताब्यात, मोठी कारवाई”
“नांदेड पोलिसांची गुन्हेगारांवर कडक नजर”
नमस्कार! नंदादीप वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत. नांदेड जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुन्हेगारीवर जबरदस्त आळा घातला आहे. पोलिस उपमहानिरीक्षकांच्या विशेष पथकाने अर्धापूर आणि देगलूर येथे एकाच दिवशी दोन मोठे धाडसी छापे टाकले.
पहिल्या कारवाईत अर्धापूर तालुक्यातील इंदिरानगर परिसरात सुरू असलेल्या बनावट सुगंधित जर्दा बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी सय्यद जाकीर उर्फ बाबा गुलाम दस्तगीर हा आरोपी कमी प्रतीच्या जर्दामध्ये रसायनांची भेसळ करून नामांकित कंपनीच्या नावाने विक्री करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी येथे जर्दा, मशीन, ग्लिसरीन आणि पॅकिंग साहित्य असा तब्बल 3 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत देगलूर तालुक्यातील कुडवाडी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. ‘टिर्रट’ नावाचा हा जुगार सुरू असताना 8 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 36 हजार रुपये रोख, 8 मोबाईल आणि 7 मोटारसायकली असा 3 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 7 लाख 37 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. संबंधित आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरातील अवैध धंद्यांची माहिती त्वरित पोलीसांना द्यावी.
👉 अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा!