लातूरमध्ये खून प्रकरणाचा जलद उलगडा!कावळे नगर हत्याकांडातील दोन आरोपी अटकेत!
लातूरमध्ये खून प्रकरणाचा जलद उलगडा!
कावळे नगर हत्याकांडातील दोन आरोपी अटकेत!
शिवाजीनगर पोलिसांची मध्यरात्री मोठी कारवाई!
झोपण्याच्या जागेच्या वादातून खून; आरोपींची कबुली!
स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कामगिरी!
नमस्कार.नंदादीप वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत.
लातूरमध्ये कावळे नगर परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 151/2026 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओम जानराव आणि वैभव उर्फ मोन्या मुंडे यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून विठ्ठल ससाणे उर्फ शहाणे मामा यांच्यावर लाकूड आणि फरशीच्या तुकड्याने हल्ला करून खून केल्याची कबुली दिली आहे.
सध्या दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू असून या जलद कारवाईमुळे लातूर पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे."