मुंबई
Writing
प्रति,
मा. श्री. अधिपरीक्षक साहेब,
अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशने,
जुने जकात गृह, मुंबई.
विषय :- साप्ताहिक “नंदादीप वार्ता” चे माहे जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या कालावधीतील अंकाची नोंद घेणेबाबत...
महोदय,
सविनय विनंती अशी की, आमचे साप्ताहिक “नंदादीप वार्ता” (लातूर) हे नियमितपणे प्रकाशित होत असून, माहे जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या कालावधीतील सर्व अंक आपल्या कार्यालयाकडे नोंद घेण्यासाठी सादर करण्यात येत आहेत.
तरी वरील कालावधीतील अंकांची आवश्यक ती नोंद आपल्या कार्यालयात करण्यात यावी, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू,
(संपादक)
साप्ताहिक “नंदादीप वार्ता”, लातूर
मो. ९४२३७३५४०९ / ८१४९७१५४०९