पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई – वाहनासह ८.६ लाखाचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला साठा जप्त; आरोपीस अटक
पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची मोठी कारवाई – वाहनासह ८.६ लाखाचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला साठा जप्त; आरोपीस अटक
लातूर, दि.18:- लातूर जिल्ह्यात मानवी आरोग्यास अपायकारक तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व सुगंधित पानमसाल्याच्या अवैध साठा व वाहतुकीविरुद्ध पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
दिनांक १८/०४/२०२६ रोजी सकाळी सुमारे ०९.४५ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन कासार शिरशी हद्दीत तांबाळा पाटी येथे सापळा रचण्यात आला. या कारवाईत पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार (क्र. MH-24 CD-3593) थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित पानमसाल्याचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आला.
सदर वाहनाचा चालक व मालक संजय काशिनाथ कन्ना (वय ४५ वर्षे, रा. उस्तुरी, ता. निलंगा) यास ताब्यात घेऊन पंचांसमक्ष सविस्तर जप्ती पंचनामा करण्यात आला. कारवाईदरम्यान विविध प्रकारच्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आढळून आला असून त्यामध्ये रत्ना 3000 तंबाखू, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-1 तंबाखू, बाबा नवरत्न पानमसाला, आर.आर. पानमसाला, रजनीगंधा इत्यादींचा समावेश आहे.
या कारवाईत एकूण अंदाजे रु. २,५९,५६०/- किंमतीचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, सदर माल वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली रु. ६,००,०००/- किंमतीची मारुती सुझुकी वॅगनर कार देखील जप्त करण्यात आली आहे. एकूण मुद्देमाल अंदाजे रु. ८,५९,५६०/- इतका आहे.
सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे (वय ५० वर्षे) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, महाराष्ट्र शासनाच्या दिनांक १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित असलेले अन्नपदार्थ विक्रीसाठी वाहतूक केल्याबद्दल आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ तसेच भा.न्या.सं. (BNS) अंतर्गत कलम १२३, २७४, २७५, २०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असून उर्वरित साठा जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील प्रशिक्षणार्थी डीवायएसपी अक्षय जाधव, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, श्रेणी पोउपनि उत्तम जाधव, रामहरी भोसले, यशवंत घुगे तसेच पोलीस ठाणे कासार शिरशी चे सपोनि गर्जे, पोलीस अंमलदार तपसे, नागमोडे , यांनी केली आहे.