“ऑल इंडिया पोलिस ड्युटी मिटमध्ये सुवर्ण, रौप्य पदकांची कमाई!”
“नांदेड परिक्षेत्राचा श्वान ‘टायसन’ देशात अव्वल!”
“ऑल इंडिया पोलिस ड्युटी मिटमध्ये सुवर्ण, रौप्य पदकांची कमाई!”
“Obedience मध्ये टॉप, Refusal of Food मध्ये उत्कृष्ट कामगिरी!”
“महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान – टायसनची दमदार झेप!”
नांदेड, दि.९:-
एक अभिमानास्पद बातमी नांदेड परिक्षेत्रातून समोर आली आहे.
नागपूर येथे पार पडलेल्या ऑल इंडिया पोलिस ड्युटी मिट 2025-26 मध्ये नांदेड परिक्षेत्राच्या ‘टायसन’ या श्वानाने उत्कृष्ट कामगिरी करत देशात आपली छाप उमटवली आहे.
‘Obedience’ म्हणजेच आज्ञाधारकतेच्या प्रकारात टायसनने सुवर्ण पदक पटकावले, तर ‘Refusal of Food’ या प्रकारात रौप्य पदक मिळवत दुहेरी यश संपादन केले आहे.
देशभरातील 28 राज्ये आणि विविध सुरक्षा दलांमधील 148 श्वानांमध्ये टायसनने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विशेष म्हणजे, 2022 पासून प्रशिक्षण घेत असलेल्या टायसनने चोरी, खून आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या तपासातही मोलाची मदत केली आहे.
टायसनच्या या यशामुळे महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली असून, संबंधित अधिकाऱ्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
👉 नांदेड पोलिसांचा हा श्वान ठरतोय देशाचा हिरो!