“लातूरमध्ये मोठी घोषणा! नव्या जिल्हाधिकाऱ्यांचा विकासाचा मोठा प्लॅन!”
“लातूरमध्ये मोठी घोषणा! नव्या जिल्हाधिकाऱ्यांचा विकासाचा मोठा प्लॅन!”
लातूर, दि.८ :-लातूरचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज पत्रकारांशी पहिल्यांदाच संवाद साधताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
त्यांनी स्पष्ट केले की, “लातूर बदलणार!” या ध्येयाने प्रशासन काम करणार आहे.
पाणीटंचाई हा जिल्ह्याचा मोठा प्रश्न असून, “पाणी प्रश्नावर ठोस निर्णय घेतले जातील” असे त्यांनी सांगितले.
जलमिशन, जल शिवार, नदी खोलीकरण या योजनांवर विशेष लक्ष देऊन जलसंधारणाला प्राधान्य दिले जाणार आहे.
तसेच मनरेगा अंतर्गत रोजगारनिर्मिती वाढवून विकासाला गती दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“विकासाचा रोडमॅप तयार असून, सर्व विभाग समन्वयाने काम करतील,” असेही त्यांनी नमूद केले.
एकूणच, लातूरच्या विकासासाठी प्रशासन सज्ज असून, आगामी काळात ठोस बदल दिसणार असल्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.