लातूरला नवे जिल्हाधिकारी!👉 डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार
👉 लातूरला नवे जिल्हाधिकारी!
👉 डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार
👉 मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार हस्तांतरण
नमस्कार!
लातूर जिल्ह्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज पदभार स्वीकारला.
मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे स्वागत करत पदभार सुपूर्द केला आणि पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, तसेच उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. बास्टेवाड यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा! धन्यवाद!