अनधिकृत अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; गावठी पिस्टल जप्त
अनधिकृत अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; गावठी पिस्टल जप्त
लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी आळा घालणे तसेच अनधिकृत शस्त्रसाठा पूर्णपणे नष्ट करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दिनांक 01 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एक इसमास विनापरवाना गावठी अग्नीशस्त्रासह रंगेहात ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर (स्थानिक गुन्हे शाखा, लातूर) यांच्या नेतृत्वातील पथकाने दिनांक 01/04/2026 रोजी दुपारी शिरूर अनंतपाळ येथील आरी मोड येथे एक इसम कमरेला गावठी अग्नीशस्त्र बाळगून संशयास्पद हालचाली करणाऱ्या संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव
भगवान हणमंत सूर्यवंशी (वय 26 वर्षे, रा. हालकी, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर)
असे सांगितले.त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेली एक गावठी पिस्टल (अंदाजे किंमत रुपये 40,000/-) आढळून आली. सदर पिस्टल जप्त करण्यात आली असून आरोपी भगवान हणमंत सूर्यवंशी याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 3(1)/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज रामगिर गिरी,प्रदीप स्वामी,सिद्धेश्वर मदने, जमीर शेख,राहुल कांबळे प्रदीप चोपणे यांनी केली आहे.