अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – एकूण ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त
लातूर, दि.20 :- लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत दिनांक 19/04/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे.
पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.
सदर कारवाईत
1) गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर)
यास ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या एकूण किंमत – ₹3,500/-
मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली.
या कारवाईत
2) मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर)
यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार ,संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे,गोविंद भोसले
पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,
पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.