नांदेड “मटका अड्ड्यावर छापा!”“13 आरोपी अटकेत”“₹92,000 जप्त”

नांदेडमध्ये मटका अड्ड्यावर छापा!
“13 आरोपी अटकेत”. “₹92,000 जप्त”
“नांदेड शहरात अवैध मटका व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कलामंदिर परिसरातील एका ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान मटका खेळताना ९ जणांना रंगेहाथ पकडण्यात आलं, तर एकूण १३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल आणि अन्य साहित्य असा एकूण ९२ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, या कारवाईत पोलिस पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली.
दरम्यान, अवैध धंद्यांविरोधात नागरिकांनी पुढे येत ‘खबर’ हेल्पलाईनवर माहिती द्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
नांदेडमध्ये सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर कारवायांवर पोलिसांचा हा मोठा प्रहार मानला जात आहे.”

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर