अवैध गुटखा व तंबाखूविरोधात लातूर पोलिसांची जिल्हाभर धडक कारवाई. एकाच वेळी छापेमारी; 11 गुन्हे दाखल, 8 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त



अवैध गुटखा व तंबाखूविरोधात लातूर पोलिसांची जिल्हाभर धडक कारवाई. एकाच वेळी छापेमारी; 11 गुन्हे दाखल, 8 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

    लातूर, दि.24 :- लातूर जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर साठवणुकीविरुद्ध लातूर पोलीस दलाने एकाच वेळी संपूर्ण जिल्हाभर अचानक धाडसत्र आयोजित करून मोठी कारवाई केली आहे.  पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर ही मोहीम राबविण्यात आली. या धडक कारवाईदरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अहमदपूर, रेणापुर, औराद शहाजनी, मुरुड, निलंगा, भादा, औसा, निलंगा, उदगीर शहर व उदगीर ग्रामीण या ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली. 
                दि. 23/04/2026 रोजी एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले असून, यामध्ये गुटखा विक्री, COPTA कायद्याचे उल्लंघन तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. सदर मोहिमेंतर्गत प्रतिबंधित गुटखा तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय केले संदर्भात पोलीस ठाणे अहमदपूर, उदगीर शहर व उदगीर ग्रामीण येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस ठाणे रेणापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून एक व पोलीस पोलीस ठाण्याच्या वतीने एक असे एकूण 05 गुटखा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर 06 कारवाई COPTA कायद्यान्वये करण्यात आले आहेत.
                  या कारवाईत खालील आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

1)औराद शहाजनी पोलीस ठाणे – संदीप राजेंद्र चिल्लरगे. वय 34, राहणार लिंगायत गल्ली, औराद शहाजनी

2)मुरुड पोलीस ठाणे – सुरज राजेंद्र माने. वय 36 वर्ष राहणार न्यू कॉलनी मुरुड.

3)उदगीर शहर पोलीस ठाणे – यश पारस डांगुर (जैन) वय अठरा वर्ष राहणार विजयनगर बिदर नाका उदगीर (अटक)

4)पोलीस ठाणे निलंगा बाबूराव दत्तू जाधव व 70 वर्ष राहणार झरी तालुका निलंगा.

5)अहमदपूर पोलीस ठाणे – शंकर दत्तात्रय ढोकाडे वय 60 वर्ष राहणार कुमठा तालुका अहमदपूर (अटक),
अमजद बैदे (फरार)


6) उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे - बालाजी वसंत खाडप, वय 40, लखमापूर, ता. रेणापूर 

7)रेणापुर पोलीस ठाणे – विकास पाटील वय 27 वर्ष राहणार पाटील गल्ली, रेणापूर(अटक)

8)पोलीस ठाणे रेणापूर अमर श्रीमंत लकडे, राहणार बोरवटी तालुका लातूर.(अटक)

9)भादा पोलीस ठाणे  – अमोल बब्रुवान चव्हाण, वय 38 वर्ष राहणार उजनी तालुका औसा

10)भादा पोलीस ठाणे – सुरेश नागनाथ बिडवे 

11)औसा पोलीस ठाणे – सरफराज कलीम शेख, वय 27 वर्ष राहणार खंदक गल्ली, औसा
               (इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे)

               सदर कारवायांमध्ये आरोपींकडून 8,97,152 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधीत पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट जप्त करण्यात आले आहे. 

             ही कारवाई कोटपा अधिनियम 2003, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत करण्यात आली असून, विशेषतः शाळा परिसरात व सार्वजनिक ठिकाणी अल्पवयीनांना तंबाखू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.सदर गुन्ह्यांमध्ये काही आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सर्व प्रकरणांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी करत आहेत.
               पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी सांगितले की, “समाजाच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल.” तर मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांनी नागरिकांना आवाहन केले की, “अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे.”
                 लातूर पोलीस दल समाजहित व सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी कटिबद्ध असून, भविष्यातही अशा प्रकारच्या धडक कारवाया सातत्याने राबविण्यात येणार आहेत.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर