लातूर मध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
🚨 लातूरमध्ये गुटखा माफियांवर मोठी कारवाई!
💥 ₹१०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त – आरोपी जेरबंद!
🚗 फोर्ड फियास्टातून होत होती गुटखा तस्करी!
👮 स्थानिक गुन्हे शाखेचा धडाकेबाज छापा!
लातूर, दि.२७ (प्रतिनिधी): लातूरमध्ये प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.
शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील खाडगाव रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका संशयित कारची तपासणी केली.
या कारमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
या कारवाईत आसद मोहम्मद हनिफ शेख या आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून,
त्याच्याकडून विमल पान मसाला, V-1 तंबाखू आणि रजनीगंधा यांसारख्या वस्तू जप्त करण्यात आल्या.
यासोबतच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली फोर्ड फियस्टा कार देखील जप्त करण्यात आली आहे.
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत तब्बल ₹१०.२९ लाख इतकी आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
लातूर पोलिसांची ही कारवाई अवैध धंद्यांविरोधातील कठोर भूमिका स्पष्ट करत आहे.