प्रभाग १६ चे नगरसेवक अॅड. प्रदीप मोरे यांचा मराठा समाजाकडून सत्कार
लातूर : लातूर शहरातील प्रभाग क्र.१६ चे स्वीकृत नगरसेवक अॅड. प्रदीपजी मोरे यांचा मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन छत्रपती कुणबी सकल मराठा समाज प्रभाग-१६ च्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजातील मान्यवरांनी अॅड. प्रदीपजी मोरे यांना शाल, पुष्पहार देऊन सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजाच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. समाजासाठी तसेच प्रभागाच्या विकासासाठी अॅड. मोरे यांनी सातत्याने कार्य करावे, अशी अपेक्षाही समाजबांधवांनी व्यक्त केली.
या प्रसंगी बालाजी गवळी, ऋषिकेश कडेने, प्रशांत गवंडगावे, तुळशीराम साळुंके, संजयकुमार सूर्यवंशी, शहाजी शिंदे पाटील, रमेश घुटे, विशाल पाटील, शेळके सर, कदम सर, अरविंद शिंदे, विवेक मोरे, मुन्ना वाकडे, राजाभाऊ दोडके, माडजे मामा, शेषेराव माने, काळे सर, इंदर भोसले, अनिल मगर आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.