लातूर

प्रति,
मा. मुख्याधिकारी,
 ________.

विषय : आपल्या कार्यालयाकडून साप्ताहिक “नंदादीप वार्ता, लातूर” या वृत्तपत्रास आतापर्यंत एकही जाहिरात प्रसिद्धीसाठी न दिल्याबाबत.....

संदर्भ :
१) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. बीटीपी/२००१/प्र.क्र. ३१/२००१/३४, दि. २ मे २००१.
२) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. जाहिरात-२००८/प्र.क्र. २३७/३४, दि. ३१ ऑगस्ट २००९.
३) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. मावज-२०१८/प्र.क्र. ३४८/३४, दि. २० डिसेंबर २०१८.
४) अधिपरीक्षक, पुस्तक व प्रकाशने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र दि. ११ फेब्रुवारी २०१९.
५) अधिपरीक्षक, पुस्तक व प्रकाशने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र दि. १५ जानेवारी २०२१.

महोदय,

सविनय निवेदन असे की, साप्ताहिक “नंदादीप वार्ता, लातूर” हे वृत्तपत्र गेल्या २० वर्षांपासून नियमित प्रकाशित होत असून हे वृत्तपत्र शासनमान्य नोंदणीकृत असून शासन निर्णयानुसार जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी पात्र आहे. 
साप्ताहिक हे वृत्तपत्र शासनमान्य नोंदणीकृत असून संबंधित शासन निर्णयातील नियम क्र. ४.३.२ नुसार या नियतकालिकाच्या महालेखानियंत्रकाकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार २००१ च्या आधारावर संबंधित शासन निर्णयांनुसार शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाहिराती मान्यताप्राप्त वृत्तपत्रांमध्ये देण्याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करण्यात आलेली आहेत. 
अधिपरीक्षक, पुस्तक व प्रकाशने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या दर प्रमाणपत्रानुसार जाहिरातीचा दर प्रति चौ. सें.मी. रु.१५ (अक्षरी रुपये पंधरा रूपये) निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच रंगीन जाहिराती, विशेष पानावरील जाहिराती इत्यादींसाठी शासन नियमानुसार अतिरिक्त दर लागू राहतात.
सदर दर सर्व शासकीय विभाग, कार्यालये, महामंडळे, मंडळे, प्राधिकरणे, उपक्रम, आयोग तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद इत्यादींना लागू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तथापि, आपल्या नगर परिषद कार्यालयाकडून आजपर्यंत साप्ताहिक “नंदादीप वार्ता, लातूर” या शासनमान्य वृत्तपत्रास एकही जाहिरात प्रसिद्धीसाठी देण्यात आलेली नाही, ही बाब निदर्शनास येत आहे.
तरी शासनाच्या वरील निर्णयांच्या अनुषंगाने व स्थानिक वृत्तपत्रांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने आपल्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या विविध जाहिराती, निविदा सूचना, जाहीर सूचना, विकासकामांच्या जाहिराती इत्यादी बाबी साप्ताहिक “नंदादीप वार्ता, लातूर” या वृत्तपत्रात प्रसिद्धीसाठी देण्यात याव्यात, ही नम्र विनंती.
आपण याबाबत सकारात्मक कार्यवाही करून पुढील काळात जाहिराती देण्याबाबत योग्य ती दखल घ्यावी, ही अपेक्षा.

आपला विश्वासू,

संपादक / प्रकाशक
साप्ताहिक "नंदादीप वार्ता", लातूर.

याची माहितीस्व प्रत सविनय सादर.
१) मा.ना.श्री.देवेंद फडणवीस साहेब, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय,
मुंबई -३२.
२) मा. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई 32.
३) मा.महासंचालक साहेब, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई 32.
४) श्रीमती वर्षा ठाकुर -घुगे, जिल्हाधिकारी, लातूर.
५) मा. सहाय्यक आयुक्त साहेब, नगर परिषद प्रशासन संचालनालय, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 14.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर