वाहन चालक चाचणीला महत्वाची सूचना

लातूर पोलीसांकडून वाहन कौशल्य चाचणीबाबत महत्त्वाची सूचना.
गैरहजर उमेदवारांना मिळणार शेवटची संधी. 7 मार्च रोजी सकाळी 5 वाजता पोलीस मुख्यालय बाभळगाव येथे चाचणी. सकाळी 8 नंतर येणाऱ्या उमेदवारांना संधी नाही.

नमस्कार… लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील वाहन कौशल्य चाचणीसंदर्भात महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.
चालक पोलीस शिपाई भरती 2024-2025 अंतर्गत वाहन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची चाचणी 4 मार्च ते 6 मार्च 2026 या कालावधीत पोलीस मुख्यालय बाभळगाव, लातूर येथे घेण्यात येत आहे.
दरम्यान काही उमेदवार या चाचणीसाठी गैरहजर राहिल्यामुळे त्यांना एक अंतिम संधी देण्यात येत आहे.
अशा गैरहजर उमेदवारांसाठी 7 मार्च 2026 रोजी सकाळी 5 वाजता वाहन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहणे अत्यावश्यक असून सकाळी 8 वाजल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना चाचणीसाठी संधी दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
ही माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर