दैनिक : पंचदीप वार्ता
प्रति,
मा. श्री.________________
________________________________
विषय : युवानेते व माजी आमदार मा.श्री. धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांकासाठी जाहिरात देणे बाबत.....
महोदय,
सविनय विनंती आहे की, दैनिक “पंचदीप वार्ता” हे वृत्तपत्र गेल्या ९ वर्षांपासून सातत्याने व विश्वासार्हपणे प्रकाशित होत आहे. सामाजिक, राजकीय व स्थानिक घडामोडींचे वस्तुनिष्ठ वृत्तांकन करून वाचकांमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे.
दिनांक ०६ एप्रिल २०२६ रोजी युवानेते व माजी आमदार मा.श्री. धिरज विलासरावजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक दर्जेदार विशेषांक प्रकाशित करीत आहोत. या विशेषांकात विविध मान्यवरांचे संदेश, लेख तसेच संस्थांच्या जाहिराती प्रकाशित केल्या जाणार आहेत.
आपल्या प्रतिष्ठित संस्थेने या विशेषांकात जाहिरात देऊन सहकार्य करावे, ही नम्र विनंती आहे. यामुळे आपल्या संस्थेची व्यापक प्रसिद्धी होण्यास मदत होईल.
जाहिरात दरपत्रक खालीलप्रमाणे आहे :
पूर्ण पान – ₹25,000/-
अर्ध पान – ₹18,000/-
पाव पान – ₹15,000/-
शुभेच्छा संदेश – ₹8,000/-
आपण आपल्या सोयीनुसार जाहिरात देऊन सहकार्य कराल, अशी अपेक्षा आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा.
धन्यवाद!
आपला विश्वासू,
दैनिक “पंचदीप वार्ता”
मो. 9423735409
संलग्न : जाहिरात आदेश नमुना
प्रति,
मा. संपादक,
दैनिक “पंचदीप वार्ता”
आपण प्रकाशित करत असलेल्या विशेषांकात आम्ही __________ रकमेची जाहिरात देत आहोत. सोबत जाहिरातीचा मजकूर/लेख जोडत आहोत. तसेच जाहिरात देयक चेक/डीडी/रोखीने अदा करत आहोत.
नोट : चेक व डीडी “पंचदीप वार्ता” या नावाने काढावा.
जाहिरातदाराची सही शिक्का