नांदेड


1️⃣ नांदेड व लातूरमध्ये मटका अड्ड्यांवर पोलिसांच्या धाड्या
2️⃣ 94 हजारांची रोकड व अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त
3️⃣ नांदेड विमानतळ परिसरात 20 आरोपी ताब्यात
4️⃣ लातूरच्या देवणी येथे ऑनलाईन मटका बुकीवर कारवाई
5️⃣ DIG शहाजी उमाप यांचा अवैध व्यवसायांवर मोठा प्रहार

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने नांदेड आणि लातूर जिल्ह्यात मटका अड्ड्यांवर धाड टाकली.
नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आनंदनगर चौक आणि सांगवी परिसरात सुरू असलेल्या मटका बुकीवर छापा टाकून 69 हजार 460 रुपयांची रोकड आणि 7 मोबाईल जप्त करण्यात आले. या प्रकरणात 20 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
तर लातूर जिल्ह्यातील देवणी येथे ऑनलाईन मटका बुकीवर कारवाई करत 25 हजार 300 रुपयांची रोकड, 9 मोबाईल आणि लॉटरी साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात 13 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी 94 हजार 760 रुपयांची रोकड आणि एकूण 2 लाख 73 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर