उदगीरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक! ११ जणांवर गुन्हा
उदगीरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक! ११ जणांवर गुन्हा
लातूर पोलिसांची मोठी कारवाई – २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
“तिर्रट” जुगार खेळताना रंगेहात पकडले आरोपी!
उदगीर तालुक्यात पोलिसांची धाड – फरार आरोपींचा शोध सुरू
जुगार अड्ड्यावर छापा : १० वाहने जप्त, मोठा गुन्हा उघड
नमस्कार. नंदादीप वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत.
“लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात पोलिसांनी बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर मोठी धडक कारवाई करत तब्बल ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मौजे मन्ना शिवारात सुरू असलेल्या ‘तिर्रट’ नावाच्या जुगारावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या धाडीत पोलिसांनी २३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यामध्ये रोख रक्कम आणि १० वाहने समाविष्ट आहेत.
या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपी सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, लातूर जिल्ह्यातील बेकायदेशीर जुगार व्यवसायावर पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशा कारवायांमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.”