लातूरमध्ये अत्याचार पीडितांना दिलासा – १७ जणांना शासकीय नोकरी!
लातूरमध्ये अत्याचार पीडितांना दिलासा – १७ जणांना शासकीय नोकरी!
मोठा निर्णय: पीडित कुटुंबांना सरकारी सेवेत संधी
SC/ST कायद्यांतर्गत वारसदारांना नियुक्ती आदेश वितरण
सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण उपक्रम लातूरमध्ये यशस्वी.
लातूर, दि. २६ : अत्याचार पीडित कुटुंबांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय लातूर जिल्ह्यात प्रत्यक्षात उतरू लागला आहे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या १७ वारसदारांना आज शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या हस्ते हे आदेश वितरित करण्यात आले. यावेळी समाजकल्याण विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासन उपस्थित होते.
राज्य शासनाच्या २० नोव्हेंबर २०२५ च्या निर्णयानुसार, अत्याचाराच्या गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील एकूण २३ प्रकरणांना मंजुरी मिळाली असून, पहिल्या टप्प्यात १७ जणांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे.
उर्वरित प्रकरणांची प्रक्रिया देखील वेगाने सुरू असून, या निर्णयामुळे पीडित कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. समाजकल्याण विभागाकडून नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.