पालकमंत्री यांना पत्र.

प्रति,

श्रीमती आर. डी. ठोंबरे,

अधिक्षक अभियंता व प्रशासक प्राधिकरण लाभक्षेत्र विकास,

कव्हा रोड, लातूर.

विषय : सन २०२३–२०२४ या वर्षापासूनची वृत्तपत्रांची थकीत देयके वेळेत अदा करण्याबाबत.

संदर्भ : विभागीय माहिती कार्यालय, लातूर यांचे वृत्तपत्र देयके/२०२५/४२ दि. १३/०१/२०२५ रोजीचे पत्र.

महोदय,

सदर विषयास अनुसरून नम्र विनंती अशी की, कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्रं. २, सिंचन भवन, जुना औसा रोड, लातूर यांच्या कार्यालयाकडून सन २०२३–२०२४ या वर्षात विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींची देयके अद्यापपर्यंत अदा करण्यात आलेली नाहीत.

सदर थकीत देयकांमुळे संबंधित वृत्तपत्र संस्था आर्थिक अडचणीत सापडत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर बाबीबाबत विभागीय माहिती कार्यालय, लातूर यांनी देखील दिनांक १३/०१/२०२५ रोजी पत्राद्वारे कळविलेले आहे.

सन २०२३–२०२४ या वर्षातील खालील वृत्तपत्रांची देयके प्रलंबित आहेत :

१) नंदादीप वार्ता – ₹.   ४५००/-
२) उधळण – ₹.४०००/-
३) बालाजी समाचार – ₹.४४००/-
४) संत दर्शन – ₹.३३००/-
५) मुरूड समाचार – ₹.४५००/-
६) निलंगा वैभव – ₹.४०८०/-
७) एकमत – ₹.९०७२/-
८) लोकमन – ₹.११७००/-
९) गुरूधर्म – ₹.८०८५/-
१०) गुरूधर्म – ₹.७३५०/-
११) मजीक पब्लिकेशन – ₹.१०३९४/-
१२) राजधर्म – ₹.९१२०/-

“एकूण थकीत रक्कम ₹. ८०,५०१/-  

(अक्षरी रूपये :- ऐंशी हजार पाचशे रुपये फक्त).

वरीलप्रमाणे कार्यकारी अभियंता, लातूर पाटबंधारे विभाग क्र. २, लातूर, सिंचन भवन, जुना औसा रोड, लातूर यांच्याकडील वृत्तपत्रांची बिले अद्याप थकीत आहेत. तरी आपण या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागास आवश्यक सूचना देऊन सदर थकीत देयके तात्काळ अदा करण्यात यावीत, ही नम्र विनंती.

आपला विश्वासू,


सविनय माहितीस्तव पत्र सादर....

१) मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, 

 मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई–३२.

२) मा.ना.श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेब,
सार्वजनिक बांधकाम मंत्री
तथा लातूर जिल्हा पालकमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई–३२.

३) मा. महासंचालक साहेब, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई 32.

४) श्रीमती वर्षा ठाकुर -घुगे, जिल्हाधिकारी लातूर.

५) मा.कार्यकारी अभियंता साहेब, 

  लातूर  पाटबंधारे विभाग क्रमांक २, सिंचन भवन, जुना औसा रोड, लातूर.

६) मा. उपसंचालक (माहिती) साहेब,

विभागीय माहिती कार्यालय,

प्रशासकीय इमारत तळ मजला लातूर.

    


Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर