स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
🚨 लातूर पोलिसांची धडक कारवाई!
🔥 बाईक चोरी करणारा आरोपी जेरबंद
💥 चाकूर-अहमदपूर प्रकरणाचा छडा
🏍️ चोरीच्या मोटारसायकली जप्त
👮 स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
लातूर, दि.२५ (प्रतिनिधी) :- लातूर जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
चाकूर आणि अहमदपूर येथील चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने अहमदपूर येथे सापळा रचत आरोपीला रंगेहात पकडले.
गोवर्धन काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
चौकशीत आरोपीने चाकूर आणि अहमदपूर परिसरातून बाईक चोरी केल्याची कबुली दिली आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरोपीला पुढील कारवाईसाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.