इतिहास साक्षी आहे –

इतिहास साक्षी आहे –
जेव्हा-जेव्हा दलित समाज मजबूत होऊ लागतो, तेव्हा-तेव्हा त्याला विभागण्याचे कट कारस्थान रचले जाते. कधी जातीच्या नावावर, कधी राजकारणाच्या नावावर, तर कधी धोरणांच्या नावावर.त्यातलाच अबकडं हा एक भाग आहे..!
----------------------------------------------------------------
                     हजारो वर्षे या देशात दलितांवर अमानुष अत्याचार झाले. त्या अन्यायाच्या राखेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा हक्क मिळवून दिला. हे आरक्षण कोणाचं दान नाही, तर संघर्षातून मिळवलेला तो हक्क आहे..!
                  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण हे सामाजिक अन्यायाविरुद्धचं शस्त्र आहे. ते कोणाच्याही राजकीय सोयीसाठी तुकडे-तुकडे करण्याचा प्रयोग नाही..!
                       आजपर्यंत दलित समाजाने हजारो वर्षांचा अपमान, अन्याय, बहिष्कार सहन केला आहे. या संघर्षातून मिळालेलं आरक्षण हे कोणत्याही सरकारच्या कृपेने नाही, तर ते संविधानिक तो हक्क आहे..!
                      ‘अ ब क ड’ वर्गीकरणाच्या नावाखाली जर दलित समाजात फूट पाडण्याचा, एकमेकांविरुद्ध उभं करण्याचा किंवा आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला, तर आंबेडकरवादी समाज हा शांत बसणार नाही..!
                  आमची भूमिका स्पष्ट आहे,आरक्षणाचा मूळ उद्देश म्हणजे सर्वात वंचित घटकांपर्यंत न्याय पोहोचवणे. पण हा निर्णय घेताना समाजात फूट पडेल, आंबेडकरी एकता कमकुवत होईल किंवा सत्ताधारी पक्ष आपला राजकीय स्वार्थ साधला जाईल, असे कोणतेही पाऊल स्वीकारले जाणार नाही..!
                    सरकारने लक्षात ठेवावे –आंबेडकरवादी समाज हा जागृत आहे,संघटित आहे आणि संघर्ष करण्याची परंपरा असलेला समाज आहे.न्याय हक्कासाठी हजारोवर्षे संघर्ष करीत आलोय..!
                   डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या हक्कांवर कुणी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, तर त्याला संविधानिक आणि लोकशाही मार्गाने हा आंबेडकरवादि ठाम उत्तर दिलं देईल.आरक्षणावर कुणाचाही डल्ला चालणार नाही…दलित समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणू शकत नाही.तसा कोणीचं प्रयत्न करू नये..!
                     दलित समाजाच्या हक्कांवर कुणी राजकारण करू नये.आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, पण संविधानाने दिलेल्या हक्कांवर कुणी डल्ला मारणार असेल, तर त्याला निर्भीड आणि झुंजार उत्तर दिलं जाईल..!
                     खरंतर तुम्हाला बोलूंन काय फायदा आमच्यातले निखारे आज आमच्याच संविधानाने दिलेल्या न्याय हक्कावर गदा आणत आहे, अस्तिणीत ले हे साप आमचेच आहे जे आम्हांला डसता, डसता स्वतःच विष कमी करुन घेत आहेत..!
                   आपल्याच हाताने आपल्याचं पायावर कुऱ्हाड दलित समाज मारत आहे..आरक्षणाचा कसा खेळ करायचा आणि कस आपसात भिडवायचं अबकड सारखं हे सत्ताधारी विरोधकांना चांगलंच माहित आहे..!
                आरे जेव्हा तुमच्या न्याय हक्कासाठी कुणीचं उभं नव्हतं तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर  उभे राहिलं रक्ताचं पाणी केलं आणि संविधानाच्या चौकटीमध्ये बसून तुला सामाजिक आरक्षण दिल..!
          आज दात आले पैसे आले, तुझ माझं कळायला लागलं का लय... आपसात मतभेद, वादविवाद करुन तुम्ही तुमच्या आणि येणाऱ्या पिढीच या अबकड मुळे वाटोळं होणार आहे.हे मात्र नक्की .! 
तुमच्या लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली असेल एवढं लक्षात ठेवा ??
                " सत्ताधारी प्रस्थापित पक्ष नेते निवडणुकीच्या राजकारणासाठी,दलित मतं फोडण्यासाठी करताय हे आम्हांला समजण्या इतकं आम्ही दूधखुळे नाहीत.ज्यांना तुमच्या सावलीचा, पाण्याचा स्पर्श होतं होता ते तुमचं चांगले करतील ही अंधश्रद्धा डोक्यातून काढून टाका रे .!
                एक व्हा नेक रहा बाबासाहेबांच्या विचाराना बेईमान होवू नका,पूर्वीच्या महार आताचे बौद्ध यांची प्रगती आरक्षणामुळे नाहीतर बौद्धिक क्षमतेमुळे झाली आहे, यांना कुठंतरी खाली खेचण्याचा हा सारा प्रयत्न सुरु आहे..!
                           विचार करा... जयभिम.. 

Popular posts from this blog

लातूरच्या शिवानीने ‘फॉरेव्हर स्टार मिस इंडिया 2025’ स्पर्धेत देशपातळीवर उंचावला लातूरचा मान

मुंबईत एकनाथ शिंदे शिवसेना भवन येथे मानधन व मोफत प्रवासाचे आश्वासन

पुरस्कारप्राप्त ऐक्याने यशाच्या नव्या पायरीवर